प्रतिनिधी , पंढरपूर : या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून नव नवीन फंडे वापरले जात आहेत . बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दहा लाख, पंधरा लाख ,वीस लाख, तीस लाख असा विकास निधी देण्याचं जाहीर केलंय. याबद्दलच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आल्या होत्या . आमदार राजेंद्र राऊत यांचे विकास निधी देण्याची घोषणा म्हणजे मतदारांना प्रलोभन व दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचा आरोप आता बार्शी मध्ये केला जातोय. आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार राज्याच्या मुख्य सचिवांकडे दीनानाथ काटकर यांनी दाखल केलीय. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील करण्यात आलीय.
