जनतेज न्युज

राज्यातून नाशिक जिल्हा करता द्राक्ष समूह विकास योजना

प्रतिनिधी, नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पुढाकाराने सुमारे 406 कोटी रुपयांची गुंतवणूक करून राज्यातील नाशिक येथे द्राक्षासाठी समूह विकास योजना अमलात आणली जाणार आहे. द्राक्षाची निर्यात चांगली व्हावी,निर्यातीत मोठी वाढ व्हावी शेतकऱ्याना उत्पादनासाठी संरक्षण काढणी पश्चात तंत्रज्ञान योग्य असे मार्गदर्शन मिळावे या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी ही  योजना महत्त्वाची ठरेल.

जागतिक बाजारपेठेत भारताचा फळबागांच्या बाबतीत जर विचार केला तर फळांचा 1.7 टक्के वाटा आणि भाजीपाल्याचा अर्धा टक्के वाटा असल्याने जागतिक बाजारातील भारताचा फळबागांचा जो हिस्सा आहे तो वाढवण्यासाठी फळांचं क्‍लस्टर निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला असून याकरता राज्यातून नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष करता 406 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.देशांतर्गत बाजारपेठेत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवणे, पीक लागवड, पीक संरक्षण, शेतकरी प्रशिक्षण काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, वाहतूक, विपणन आदी सर्व सोयी एकाच छताखाली मिळवण्यासाठी या समूह विकास योजनेचा उपयोग होणार आहे.