जनतेज न्युज

राज्यात अतिवृष्ठीमुळे शेतकऱ्यांच जे नुकसान झाले त्याबाबतीत राजकारण न करता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज – खासदार संभाजीराजे

प्रतिनिधी , राज्यात अतिवृष्ठीमुळे शेतकऱ्यांच जे नुकसान झाले त्याबाबतीत राजकारण न करता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे अस मत खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात घेतलेल्या पञकार परिषदेत व्यक्त केले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने आपल्या निधीतुन तातडीने निधी दिला पाहिजे..जो पर्यत ओला दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत केंद्रीय पथक पाहणी करण्यास येणार नाही .आज जर तातडीने शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर पुढील रब्बीच पिक शेतकरी कसे घेणार अस मत संभाजीराजे यांनी व्यक्त केल.याकरता ओला दुष्काळ जाहीर करावे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.तसेच विमा कंपन्या आता जाचक अटी टाकुन शेतकऱ्यांना वेठीस धरतात अशा कंपन्यावर कारवाई केली पाहिजे .