प्रतिनिधी , पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजातील सर्व घटकांकरता काम करत असुन 2022 पर्यंत या देशात ज्यांना घर नाही अशा व्यक्तीना घर देण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला असुन ते स्वप्न नक्कीच पुर्ण होईल .अस मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आँनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातुन व्यक्त केले.
राज्यात पुण्यामध्ये पहिल्यादांच प्रधानमंत्री आवास योजनच्या अंतर्गत घरे बांधण्यास सुरवात झाली असुन याकरता आँनलाईन सोडत पध्दतीने घरकुलांचे वाटप आज केंद्रीय माहिती प्रसारण,वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी पुण्यातुन चंद्रकांत पाटील,खासदार गिरीश बापट,महापौर मुरलीधर मोहोळ आणि नगरसेवक उपस्थित होते.हडपस,वडगांव बुद्रुक येथे ही घरे बांधली जात असुन काहीचे कामही सुरु झाले आहे. या योजनेच्या माध्यमातुन एक लाख अर्ज आले होते. त्यापैकी 38 हजार व्यक्ती पात्र ठरले तर यातुन तीन हजार जणांनाच घरे पहिल्या टप्यात मिळणार आहे. याकरता पुणे महापालिकेने जागेकरता आपला निधी दिला असुन केंद्र सरकार यात काही निधी उपलब्ध करुन देणार असुन लाभार्थी यांनी तीन लाख रुपये भरायचे आहेत. मोदी सरकार केंद्रात आल्यानतंर जनधन योजना,अटल पेन्शन योजना,मुद्रा योजना ,आयुष्यमान भारत ,अशा विविध योजना सर्व घटकाकरता उपलब्ध करुन दिल्या असुन आज सशक्त भारत घडत आहे. यात सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे आहे तरच आपण येणा-या प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकतो. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन प्रत्येकाला घर देणे ही मोदी सरकारची इच्छा असुन त्या गोष्टी प्रत्यक्षात घडत आहे ही चांगली बाब असल्याचे जावडेकर यांनी आँनलाईन च्या माध्यमातुन सांगितले
