जनतेज न्युज

राज्यात महाविकास आघाडी सरकार मध्ये तिन पक्ष अतिशय चांगल्यापध्दतीने काम करतय – चोपडा

प्रतिनिधी , मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार मध्ये तिन पक्ष अतिशय चांगल्यापध्दतीने काम करतय आणि एकदिलाने काम करतय विरोधी पक्ष हा अस्वस्थ झालेला आहे त्यांना जे पाहिजे ते होत नाहीये अस्वस्थतेतून हे वाक्ये आलेलं असं वाटतं. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रतिअतिशय एकनिष्ठ कटीबध्द आहे.

शेतकऱ्यांच्या संदर्भातील ज्या समस्या असतील त्या सोडविण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री आमचे सर्वच मंत्रीमंडळातील सदस्य अतिशय चांगले पध्दतीने काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांचे किती हाल झालेत, शेतकऱ्यांचे आत्महत्यात वाढ झाली, हे कसे विसरतात याचे आम्हाला प्रश्न पडतो.