जनतेज न्युज

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली मोठी कारवाई

प्रतिनिधी , पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. स्थानिक कारवाईचे धागेदोरे थेट गुजरातमध्ये लागल्याने थेट कंपनीच सील करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई झाल्याने अनधिकृत मद्य विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुजरात येथील वळसाड मधील एक कारखाना स्थानिक कारवाईत सहभागी असल्याचं तपासात समोर आलं होतं. पुण्यात ताडी निर्मिती करणाऱ्यांवर कारवाईतून गुजरात कनेक्शन समोर आलं होतं. त्यानुसार पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने थेट गुजरातमध्ये संबंधित कारखाना सील करत कारवाई केली आहे. त्यात साडेतीन लाखाहून अधिक मुद्देमाल पुणे पोलीसांनी हस्तगत केला आहे.