जनतेज न्युज

राणे कुटुंबाची चौकशी झाली तर अख्खे कुटुंब जेलमध्ये जाईल…

प्रतिनिधी , अमरावती : निलेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात आरोपप्रत्यारोपाला सुरवात झाली आहे इतके गुन्हेगार जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी पक्षात आहे असे विधान निलेश राणे यांनी केले होते, याच विधानाचे खडणं करत आधी स्वताचे आत्मपरीक्षण करावे असा टोला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशचिटणीस प्रदीप राऊत यांनी लावला आहे राणे कुटुंबानी दुसऱ्यावर असे आरोप करणे हेच हास्यपद आहे.विविध गंभीर प्रकरनामध्ये राणे कुटुंबाचे नांव येते हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे इतरांवर असे आरोप करताना आधी आपले आत्मपरीक्षण करावे जर राणे कुटूंबाची चौकशी झाली तर अख्ख राणे कुटुंब हे जेल मध्ये जाऊ शकते असा आरोप देखील यावेळी राऊत यांनी केला.