जनतेज न्युज

रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड हे फक्त नावाचे केंद्रीय राज्यमंत्री – खा. चंद्रकांत खैरे

प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरात शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की  केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड हे फक्त नावाचे मंत्री असून यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे अधिकार नसल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज रोजी केला आहे. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की येणाऱ्या 2024 ला दाखवील की कोण कोणाची शिकार आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना बोलण्याच्या भाव नसतो ते काही पण बोलतात आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही असा टोलाही शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपाला लगावला आहे. भाजपने औरंगाबाद शहरात काढलेला जल आक्रोश मोर्चा हा मोर्चा नसून राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न भाजपने केल्याची टीकाही त्यांनी आज रोजी केली आहे.सदरील पत्रकार परिषद आज रोजी संपन्न झाली आहे.