प्रतिनिधी , नागपूर : भारताच्या नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या विषयी आपत्तिकारक विधान काँग्रेस नेते अधीरंजन चौधरी यांनी केलं त्याचे पडसाद आज नागपुरात देखील उमटले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चौधरी आणि काँग्रेस विरोधात जोरदार नारेबाजी करत चौधरी यांचा पुतळा पेटविला. विधान भवन चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला काँग्रेस नेते देश विरोधातील अश्या प्रकारचे विधान देत असतात मात्र युवा मोर्चा अश्या पद्धतीने अपमान सहन करणार नसल्याचं यावेळी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी सांगितलं
