प्रतिनिधी , मुंबई दि.७- आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्र्यांचा जनता दरबार घेतला.यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.सोबतच मंत्र्यांच्या समस्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावर, पवार साहेबांना मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्याची सवय आहे. मंत्री कार्यरत आहेत का? जनता दरबार कसा सुरू आहे? याची माहिती ते घेत असतात. तिच माहिती त्यांनी आज घेतली, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. काल मंत्रिमंडळाने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचा बांधकाम व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. चलनातील पैसा हाच या व्यवसायात असतो, असं सांगतानाच कालच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधकांना टीका करण्यासाठीच विरोधात बसवलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने नोटीस बजावल्याचं मला आत्ताच तुमच्याकडून कळलं आहे, असं सांगत आव्हाड यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला.
