प्रतिनिधी , पुणे : कोरोनाच्या लढाईत आपला परिवार, घरदार विसरून जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करणा-या पोलीस, डॉक्टर, परिचारिका यांना राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पार्टी ट्रस्टच्यावतीनं फेसबूकवरून अनोखा मानाचा मुजरा केला आहे.
“कोरोनाला हरवण्यासाठी लढणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस प्रशासन, अनेक प्रशासकीय यंत्रणा व इतर सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र सरकारला मानाचा मुजरा व जय महाराष्ट्र…!
आम्ही घरात आहोत, आपणही घरात थांबा…!”
फेसबूक पोस्टमधूून असा संदेश देत प्रत्येक कार्यकर्त्याने एक पाटी हातात धरून फोटो कोलाजमधून हा मानाचा मुजरा केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे युवा कार्यकर्ते पार्टी ट्रस्टच्या माध्यामातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. कोरोनाच्या जागतिक लढाईतही या संघटनेने आपला सहभाग नोंदवला आहे.
