प्रतिनिधी , पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दूध दरवाढीसाठी कात्रज येथील मुख्य चौकात दूध दरवाढ आंदोलननिमित्त नागरिकांना मोफत दूध वाटप करण्यात आले . राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशाने हे दूध दरवाढ आंदोलननिमित्त नागरिकांना मोफत दूध वाटप करण्यात आले .
यावेळी दुधाचा दर ३० रुपये मिळाला पाहिजे ,दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळाले पाहिजे , सरकारने प्रति लिटर १० रुपये अनुदान मिळाले पाहिजे . ते दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे या मागण्या मा . मुख्यमंत्री व दुग्ध विकास मंत्री यांच्याकडे पोहचवावे , अशी विनंती करण्यात आली .
या दुध दरवाढीसाठी आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष विनायक रुपनवर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र सचिव बाळासाहेब कोकरे , संपर्कप्रमुख अंकुश देवडकर , पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अँड. संजय माने पाटील ,पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई ढेबे , पुणे शहर महिला अध्यक्षा सविता जोशी , पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोकरे , पुणे शहर सचिव वैद्यनाथ स्वामी , पुणे शहर उपाध्यक्ष राजेश लवटे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते सचिन गुरव व खडकवासला विधानसभा अध्यक्ष प्रथमेश गवळी आदी पदाधिकारी व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .
