जनतेज न्युज

रिक्षाचालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसाह्य द्या

प्रतिनिधी , ठाणे देशात, राज्यात कोरोना विषाणूची महामारी जोरात फैलावत आहे. आपल्या आवाहना नुसार महाराष्ट्रातील कोरोना संकटाचा सामना सगळी जनता करीत आहे.राज्यात महाराष्ट्र सरकारने संचारबंदी, लाँकडाऊन सारखे चांगले निर्णय घेऊन कोरोना विषाणूचा प्रभाव, प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक योजना अमलांत आणल्या आहेत. मात्र, त्याचा फटका हातावर पोट असणार्‍या रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याने रिक्षाचालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसाह्य देण्यात यावे, अशी मागणी प्रहार रिक्षा टॅक्सी युनियनचे ठाणे शहराध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.