जनतेज न्युज

रिक्षा व मोटरसायकल चोरणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली :  डोंबिवली मानपाडा पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला अटक केली आहे . मास्टर की च्या सहाय्याने हा वाहन चोरी करून चोरी केलेली वाहने   झाडाझडुपांमध्ये लपवून  वाहने विकण्यासाठी  ग्राहकाच्या  शोधत असलेल्या आरोपीला पोलिसांना विक्री आगोदर ताब्यात घेतले आहे  .आकाश ढोणे अस या चोरट्याच नाव असून आकाश विरोधात डोंबिवली मानपाडा , मुंब्रा , भिवंडी शांती नगर , कल्याण महात्मा फुले पोलिस ठाने पोलिस ठाण्यात एकूण  १० गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेल्या  पाच रिक्षा व पाच दुचाक्या जप्त केल्या आहेत. डोंबिवली शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या . या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेणं सुरू केलं होतं .चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले . ज्या भागातून वाहने चोरी झालेली आहेत त्या भागात गस्त ठेवत संशयितांवर पाळत ठेवली जात होती . या दरम्यान आकाश ढोणे  हा संशयित तरुण पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने १० गुन्ह्यांची  कबुली दिली .चोरी केलेली वाहने विकण्यासाठी तो ग्राहक शोधत होता मात्र त्या आधीच तो पोलिसांच्या हाती लागला.चोरी केलेला रिक्षा व मोटरसायकल आकाश डोंबिवली ग्रामीण परिसरात झाडाझुडपात लपवून ठेवायचा पोलिसांनी आकाशने चोरी केलेल्या पाच रिक्षा पाच दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.