प्रतिनिधी , अहमदनगर: संगणमेर शहरामध्ये आज शासकीय गेस्ट हाउसमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट विशेष मेळावा पदाधिकाऱ्यांसोबत संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुधाकर रोहम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेतृत्व अडवोकेट किरण रोहम यांनी कार्यकर्ता मार्गदर्शन केले तसेच गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात महापुराने थैमान घातल्यामुळे अर्धा महाराष्ट्र पाण्यात गेला जीवितहानी मध्ये जे लोक मृत्यू पावले त्या लोकांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विनोद गायकवाड ,रूपवते सर, गायकवाड सर अकोले ,राहता तालुक्यातील पदाधिकारी व संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.
