जनतेज न्युज

रेणू शर्मा यांच्याविरोधी तक्रार दाखल केल्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधि , मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या झालेल्या आरोपानंतर भाजप नेता कृष्णा हेगडे यांनी आज आंबोली पोलीस स्टेशनमध्ये येऊन रेणू शर्मा यांच्याविरोधी तक्रार दाखल केली व यानंतर आपली बाजू मांडली.

सुरुवातीपासूनच त्यांनी रेणू शर्मा यांना टाळत असल्याचे सांगितले.

रेणू शर्मा यांना याआधी 2 वेळा भेटल्याचेही ते म्हणाले.मनसे नेते मनीष धुरी यांच्यासोबत सुद्धा असे घडल्याचे त्यांनी सांगितले.

हनी ट्रॅप संदर्भात प्रकाश हेगडे यांनी सांगितले की,हे ब्लॅकमेलिंगसाठी करण्यात येते. धनंजय मुंडे, मनीष धुरी व प्रकाश हेगडे याच्यासोबत एकाच महिलेचे आरोप योगायोग असू शकत नाही,असं मत त्यांनी मांडले आहे.