प्रतिनिधी , नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईनं मोठी खळबळ माजली आहे.रोलेट या ऑनलाइन एपवर सातत्यानं खेळून कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली,गुन्हा दाखल झाला आणी नाशिक पोलिसांनी याची पाळंमुळं खणून काढायला सुरुवात केली.याच प्रकरणात या कैलास शहाला अटक करण्यात आली आहे.लॉकडाऊन काळात ऑनलाइन गेम्स खेळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं,त्यातच हा गेम खेळतांना मिळणारा पैसा आणी त्यामुळं व्यसन लागल्याच्या अनेक तक्रारींची राज्यात नोंद झाल्याचं,पोलिसांचं म्हणणं आहे.याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केलाय.दरम्यान,या प्रकरणात अजून अनेक बडे हाती लागणार असल्याचे संकेत मिळताय.खरं तर रोलेट कॅसिनो या ऑनलाइन खेळाला सरकारी परवानगी आहे की नाही ? याबद्दल मात्र तपास यंत्रणा काही बोलायला तयार नाही.याचमुळं या प्रकरणातील गूढ कायम आहे.
