प्रतिनिधी : पुणे , नाताळनिमित्त वारजे येथील गोकुळ नगरमधील लाईट हाऊस मिनिस्ट्रीमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला . येशूच्या जन्माची सुवार्ता पास्टर मेरी डिक्रूज यांनी सांगितली . युवकांनी येशू जन्माचे गाणी गायली . यावेळी ख्रिसमस कॅरल सिंगिंग , लहान मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले . चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती . चर्चमध्ये आलेल्या चिमुकल्यांनी सांताक्लॉजसोबत नृत्य केले .
यावेळी सर्वांनी स्नेहभोजनचा आस्वाद घेतला . या कार्यक्रमामध्ये वारजे परिसरातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यावेळी आरोज डिक्रूज , विकी कानडे , दुर्वेश यादव , श्रुती कानडे , प्रतिभा जाधव , शानो शर्मा व विल्सन डिक्रूज आदी मान्यवर उपस्थित होते .
