प्रतिनिधी , कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सिल्लोड परिसरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र दिसुन येत आहे.
सिल्लोड तालुका परिसरात अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात आणि ते विक्री करण्यासाठी आपले हक्काचे व्यासपीठ म्हणुन शनिवारचा भराडी, रविवारचा सिल्लोड आठवडी बाजारात घेऊन जात असतात मात्र प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशामुळे पुन्हा एकदा भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असुन पुन्हा भाजीपाला शेतात फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर वांगे, टमाटे, शेंगा, कोशिंबीर, मेथी पालक व इतर भाजीपाला पीक तोडणी अभावी शेतात च खराब होत आहे. सिल्लोड परिसरातील मोठे बाजार शनिवार रविवार रोजी येत असल्याने शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडले आहे. बाजार बंद च्या निर्णयावर भाजीपाला उत्पादक शेतकरी पांडुरंग कुदळ यांनी RNOला आपली प्रतिक्रिया दिली आहे.
