प्रतिनिधी, औरंगाबाद : आज गुरुवार 16 जून रोजी औरंगाबाद शहरातील छावणी परिसरातील लीटील माध्यमिक शाळेच्या समोर विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर कुणाल खरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे आंदोलन करण्यात आले आहे.
फीज भरण्यासाठी शाळेच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप एम आय एम विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.
पालकांची अडवणूक करू नये,विद्यार्थ्यांना सरळ प्रवेश देण्यात यावे अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.शालेय प्रशासनाने या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर दररोज सदरील शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा एम आय एम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर कुणाल खरात यांनी सदरील इशारा दिला आहे. सदरील आंदोलनाच्या अनुषंगाने छावणी पोलिसांनी सदरील शाळेला मोठा बंदोबस्त दिला होता या वेळी विविध मागणीचे निवेदन आज रोजी सदरील संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे दोन दिवसात सदरील प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेच्या वतीने आज रोजी देण्यात आला आहे.
