जनतेज न्युज

लॉकडाउन मुळे बाजारपेठा बंद, भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात

प्रतिनिधी , बीड : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोचिंग क्लासेस, यात्रा राजकीय-सामाजिक कार्यकम व बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे. मात्र आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र दिसुन येत आहे.
बीड जिल्ह्यात उसाच्या उत्पादनासोबत अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादनही घेतात. पिकवलेला भाजीपाला विक्री करण्यासाठी आपल्या हक्काची बाजारपेठ म्हणुन आठवडी बाजारात विकत असतात. मात्र कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्यामुळे प्रशासनाच्या आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशामुळे, पुन्हा एकदा भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कष्टाने पिकवलेला भाजीपाला शेतातच फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांमुळे लवकर शासनाने यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.