जनतेज न्युज

लॉकडाऊनच्या नियमांचं उलंघन कराल तर होणार कडक कारवाई

प्रतिनिधी , अमरावती : रात्री 8 वाजल्या पासून अमरावती शहरात लॉकडाऊनला सुरूवात होणार आहे. त्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाली आहे. कोरोनाने अमरावती शहरातील 60 टक्के भाग बाधित झाला आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांनवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी 5 पथके तैनात करण्यात आली आहे,तर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अमरावती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली, तर 1 मार्च पर्यंत हा लॉकडाऊन असून या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक कामासाठी सुद्धा येणाऱ्या लोकांनवर नजर राहणार असून अत्यावश्यक कामासाठी मास्क, सोशल डिस्टनचे पालन करणे आवश्यक आहे, त्यामुळे लोकांनी या लॉकडाऊनला साथ द्यावी व विनाकारण कोणी बाहेर पडू नये असे आवाहन सुद्धा मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.