जनतेज न्युज

लॉक डाऊन काळात 4 स्टार हॉटेल मालकाने हॉटेल परिसरात चक्क फुलवली शेती

प्रतिनिधी , इगतपुरी इगतपुरी येथील मुंबई नाशिक मार्गावर घाटनदेवी मंदिराजवळ मानस रिसॉर्ट हे 4 स्टार हॉटेल आहे. या हॉटेल चे मालक नितीन करंबळेकर ह्यांना लॉक डाऊन मध्ये हॉटेल परिसरातील पडीत व खडकाळ जागेवर भाजी, फळे, फुले यांची लागवड करण्याची कल्पना सुचली. अनेक लोकांनी त्यांना सांगितले की ह्या जागेवर कुठलेही शेतीचे पीक येणार नाही परंतु त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला व आपल्या कल्पनेला अंतिम रूप देण्यासाठी त्यांनी आपले काम सुरू केले. कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता, नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. आज हॉटेल मध्ये वास्तव्यास येणारे नागरिक स्वतः हाताने भाज्या तोडून किचनमध्ये भाजी तयार करण्यासाठी देतात. त्यांना नैसर्गिक पद्धतीने पिकवकेला भाजीपाला फळे यांचा आस्वाद घेत असल्याचं आणांड त्यांच्या चेहऱ्यावर बघावयास मिळतो. करंबळेकर यांनी आतापर्यंत हॉटेल आवारात टमाटे कोबी फ्लॉवर वाटाणा टोमॅटो शिमला पालक कोथमिर इत्यादी भाज्यांची लागवड व विविध प्रकारची फुले , स्ट्रॉबेरी यासह विविध फळांची लागवड ही केली असून त्याचेही पीक हळू हळू बहरत आहे. त्यांचा हा तालुक्यातील जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असेल