जनतेज न्युज

लॉयर्स फॉर सोसायटी तर्फे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड सत्कार समारंभ

प्रतिनिधी, औरंगाबाद : भारताला विकसित देश म्हणून आघाडीवर आणण्यासाठी केंद्र सरकार नवतंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे. पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात ३९ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर वाढविण्यावर भर दिला जात असून भारताने ‘क्रिप्टो करन्सी स्वीकारली आहे. काही वर्षांत त्याचा सर्वत्र वापर दिसेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सत्कार समारंभात केले.

औरंगाबादेतील लॉयर्स फॉर सोसायटी तर्फे संत एकनाथ रंगमंदिरात शनिवारी केलेल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. कराड बोलत होते. सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. रवींद्र बोर्डे आणि अॅड. अमित देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्या. बोर्डे यांनी वकिलांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. चैतन्य धारूरकर यांनी संचालन केले. संस्थेचे पदाधिकारी एड रवी आडगावकर, फैयाज पटेल, सचिन नावंदर, अमोल जगतकर, लक्ष्मण कुलकर्णी, संगीता धुमाळ योगिता थोरात, सबाहत काझी उपस्थित होते.