प्रतिनिधी , उस्मानाबाद : लोकशाही रुजवण्यासाठी अनेक लढाया कराव्या लागल्या मात्र सध्या लोकशाहीत संसद व विधीमंडळात कामकाज सोडून होत असलेला राडा अत्यंत चुकीचा आहे . वयक्तीक हेवेदावे मांडण्याचे हे ठिकाण नसुन याच पावित्र राखण्याची जबाबदारी सत्ताधारी व विरोधी सदस्यांची असते असे मत समाजवादी जेष्ठ नेते माजी खासदार भाई पन्नालाल सुराणा यांनी मांडले .
