प्रतिनिधी , अमरावती : अकोला ,अमरावती मध्ये जे लॉक डावून लावण्यात आल ते नियमा प्रमाणे लावण्यात आलेल नाही.बाकी देशात लॉक डावून लावण्या आधी लोकाना मदत केल्या जाते आधी आमची नुकसान भरपाई दया नंतर लॉक डावून लावा,अन्यथा आम्ही उदयाला अमरावती शहरातील सर्व मार्किट उघडू प्रशासनाला जे कारवाही करायची ते करू दया असे मत संपादक प्रकाश पोहरे यानी अमरावती येथील पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केलय. यावेळी शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा उपस्थित होते ,लोकांच्या प्रश्नापासून तोंड लपवण्यासाठी व अधिवेषणावर येणारे लोकांच्या मोर्च्या पासून वाचन्यासाठी हे सरकार कोरोनाला समोर करून लोक डाऊन लावत आहे, त्यामुळे कोरोना कसा नौटंकी आहे हे आम्ही सिद्ध करू शकतो, त्यामुळे उद्या सर्व व्यापाऱ्यांनी आपलं मार्केट उघडा जे काही गुन्हे दाखल करायचे आहे ते प्रकाश पोहरे वर दाखल करा, मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार आहे असेही यावेळी प्रकाश पोहरे यांनी सांगितले
