जनतेज न्युज

वंचित आघाडी कडून युवा जोडो अभियानाला सुरवात.

प्रतिनिधी , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तीन महिण्यान आधी वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीची स्थापना करण्यात आली. त्याच माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरुण युवा, युवती ह्या वंचित आघाडीच्या युवा आघाडीमध्ये मोठ्या संख्येने सामील होत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व युवा वर्गा मोठ्या संख्येने सामील झाले होते. येणाऱ्या काळात जो काही राजकारणात भटकलेला युवा वर्ग आहे, ज्याचा फक्त राजकारणासाठी वापर करण्यात आला आहे, अश्या युवा वर्गाला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी ने युवा आघाडीची स्थापना केली आहे, तसेच युवा आघाडीची मोट बांधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या निरीक्षक असलेल्या शामिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धुळे शहरातून भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली.