जनतेज न्युज

वर्ध्यात उमेद अभियानातील प्रभागव्यवस्थापकांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन उपोषण

प्रतिनिधी, वर्धा : जागतिक महिला दिनी गांधी चौकात इंटकच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय उपोषण करण्यात आले आहे. प्रभाग व्यवस्थापकांच्या प्रमुख मागण्या काही अश्या आहेत, जिल्ह्यातील सर्व सीएलएफ मॅनेजर महिलांचे मानधन रेगुलर त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. २०१८ पासून नमूद केलेली ५ टक्के वाढ त्वरीत देण्यात यावी.

रजिस्ट्रेशन प्रक्रिया हि सी एलएफसाठी करण्यात येत असल्याने या मधे सीएलएफ मॅनेजरचा समावेश करण्यात यावा.

मानधनात वाढ करून मानधन रेग्युलर देण्यात यावे

आज महिला दिनाच्या निमित्ताने तरी प्रश्न सुटतील अशा अपेक्षेसह आज महिला उपोषणाला बसल्या होत्या.