प्रतिनिधी , मुंबई : काल धारावीत एक कोरोनाबाधित ऋग्ण आढळल्याने वस्तीतले लोक हादरले आहेत. धारावीच्या आमदार व मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज अधिकाऱ्यांसोबत धारावीला भेट दिली व लोकांना धीर दिला. गायकवाड यांच्यासोबत डीसीपी, धारावीचे दोन्ही वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुरवठा अधिकारी उपस्थित होते. गायकवाड यांनी लोकांच्या तक्रारी ऐकल्या व धारावीत लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले.
धारावीतील नागरिकांनी घाबरू नये. प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या आहेत. शासन-प्रशासनाला सहकार्य करा. शासनाच्या सूचनांचे पालन करा व घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन केले. कोरोनाबाबतच्या या बैठकीत धारावीचे नगरसेवक हाजी बबूखान, भास्कर शेट्टी, जियाउद्दीन शेख, हरगोपाल कृष्णन, मायकल गुणवंत, व्यंकटेश पिल्लै, शंकर संगम, परवेज अहमद आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
