प्रतिनिधी , लातुर : भारत हा देश गावखेड्यांचा देश आहे. इथं कारभारी उत्तम भेटला तर गावाचा कायापालट आपल्याला पाहायला मिळतो. शिक्षण, आरोग्य, रस्ते, सिंचन, प्रकाश योजना, उत्तम पर्यावरण यांच्या सुनियोजित उपक्रमाच्या राबवण्यात आल्याने अनेक खेडी आज राज्यच नव्हे तर देशात आदर्शवत आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वाघोली गावाने असाच काहीसा विकास साधण्यासाठी आदर्शवत कार्य केलं आहे.
आज राज्यात व देशात आदर्श गाव म्हटले की राळेगणसिद्धी व हिवरेबाजारला सर्वजण ओळखतात. पण याच गावांचा आदर्श घेत अनेक गावे आता समृद्ध होत आहेत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वाघोली असंच एक विकासाने समृद्ध गाव आहे गावचे सरपंच गोपीचंद लिंबराज पवार यांनी पाच वर्ष केलेला विकास गावासमोर बोलून दाखवला मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये गावाने पूर्ण पॅनेल निवडून दिल्यामुळे सर्व काही शक्य झाले स्वतःच्या खिशातून एक लाख वीस हजार रुपये खर्चून शाळेसाठी शिक्षक कमी असल्यामुळे गावातील डीएड केलेल्या दोन मुली शिकवण्यासाठी नेमिले त्या मुलींचा अर्धा पगार स्वतः सरपंचांनी अर्धापगार शिक्षकांच्या खिशातून घालून हा उपक्रम राबवला पाणी फाउंडेशन सारखा गावाच्या पाण्यात भर पडावी म्हणून सहा लाख रुपये खर्चून पाणी फाउंडेशन राबवला गावाला पाच वर्ष एकही रुपया न घेता सर्व कागदपत्रे पुरवली गावाच्या गोरगरीब जनतेसाठी रमाई आवास 113 घरकुल फायनल केले शबरी आवास सहा घरकुले फायनल केली191 लोकांची पंतप्रधान आवास योजने मधून घरकुल मिळण्यासाठी यादी मंजूर केलेली आहे गावचा निकडीचा प्रश्न रोडचा तोही शासनस्तरावरून मुख्यमंत्री सडक योजना दोन कोटी 65 लाख रुपयाचा निधी खेचून आणला गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रोड पेवर ब्लॉक नवीन अंगणवाडी इमारत सार्वजनिक नळाच्यादोन टप्प्यात पाईपलाईन व नळ एमआरजीएस मधून सार्वजनिक विहीर टंचाई मधून पाईपलाईन एस आर एफफंडातून वाघोली अपचुंदा रस्त्याचे मजबुतीकरण गावात पूर्ण कुटुंबाला सौचालय गावातील प्रत्येक कुटुंबाचेसांडपाणी जिरवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला शोष्खड्डा पंचवीस पंधरा मधून दहा लाखाचा सिमेंट रोड पंचवीस पंधरा मधून सभाग्रह आमदार अभिमन्यू पवारविकास निधी मधून पाच लाख रुपयांचे सभागृह आमदार बसवराज पाटील यांच्या निधीतून दहा लाखाचे सभाग्रह असे अनेक कामे गावासाठी खेचून आणले व पुढच्या विकास कामाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवलेला आहे यामध्ये भास्कर पेरे पाटलाच्या ग्रामपंचायतीचा वारसा जपण्याचे आश्वासन दिले आहे.
