जनतेज न्युज

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी सतर्क हॉटेल ,मॅरेज हॉल मालक व्यापारी संघटनांना आयुक्तांना सक्त इशारा नियमांच पालन करा अन्यथा कारवाई अटळ

प्रतिनिधी , मुंबई : मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली देखील कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती मात्र ऑगस्ट पासून कोरोनाला थोपवण्यात महापालिकेला यश आलंय .गेल्या काही महिन्यांपासुन दोन आकडी असलेला कोरोना रुग्णांचा आकडा आठवडाभरापासून पुन्हा हळू हळू वाढत असून आज 128 रुग्ण आढळले आहेत .राज्यात मुंबईसह अनेक शहरात कोरोना रुग्ण संख्येत वाढत होत असून गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवलीत शहरात कोरोना रुग्णामध्ये काही प्रमाणात वाढ झालीय .या वाढत्या रुग्ण संख्येच्या पालिका प्रशासन सतर्क झालं असून माक्स न वापरणाऱ्या विरोधात सुरू असलेली कारवाई आणखी सक्त केली जाणार आहे ,सोशल डिस्टसिंग चे नियमांचे पालन होत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत देखील पालिकेने व्यापारी संघटनाना ,हॉटेल संघटना ,बेंक्वेट मॅरेज होल्स च्या मालकांना कोरोना काळातील नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत .तसंच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पालिकेने दिले असून तपासणी करण्यासाठी पथके नेमण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले