जनतेज न्युज

वाशिम च्या प्रवाशांना परभणीत प्रवेश नाही परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

प्रतिनिधी , वाशिम : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता परभणीचे जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढला आहे या देशात त्यांनी परभणी जिल्ह्यात येणाऱ्या वाशिम सोबतच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या एसटी बसेस ला पुढील आदेशापर्यंत परभणी जिल्ह्यात प्रवेश बंद केलाय..
वाशिम जिल्ह्यातून पहाटे सात वाजता जाणारी परभणी बस आजपासून बंद करण्यात आली आहे कारण कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता परभणीचे जिल्हाधिकारी यांचा आदेश वाशिम बस डेपो ला मिळालाय..
कोरोना संसर्गाचा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग जास्त पसरू नये म्हणून परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढले असल्याचे बोलले जाते मात्र वाशिम जिल्ह्यातून परभणी जाणाऱ्या प्रवाशांना आजपासून परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेशापर्यंत परभणी जिल्ह्यात जाता येणार नाही..
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही उपाय योजना वाशिम जिल्ह्यात हि राबवली तर बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना संसर्गचा जिल्ह्यातील नागरिकांना धोका निर्माण होणार नाही..