जनतेज न्युज

वाहतूक शाखा क्रमांक एक ने पकडल्या बुलेट दुचाकी गाड्यांवर 4 लाख 54 हजार 800 रुपये दंड

प्रतिनिधी , नांदेड : शहरातील वाहतूक शाखा क्रमांक एक ने पकडलेल्या एकूण 69 बुलेट दुचाकी गाड्यांवर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणा नंतर त्यांच्याकडून4 लाख 54 हजार 800 रुपये दंड आकारण्यात आला आहे
मागील काही दिवसांमध्ये पोलीस विभागाच्या वतीने दुचाकी गाड्यांमध्ये फेरबदल करून त्याचा वापर करणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार नांदेड शहरातील वाहतूक शाखा क्रमांक एक ने एकूण 69 उलट दुचाकी गाड्या पकडल्या या गाड्यांचे निरीक्षण चंद्रशेखर कदम यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला लिहिलेल्या पत्रा नंतर आज प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी आणि वाहतूक शाखा क्रमांक एक ने ही संयुक्त कारवाई केली आहे