प्रतिनिधी , सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील बारा वर्षाच्या कालावधी संपलेल्या आरक्षणातील जागेवरील आरक्षणाने बाधित झालेल्या रहिवाशांची व पूर पट्ट्यातील रहिवाशांच्या ज्यांना पाणी-घरपट्टी विभागात नोंद असलेल्या घरांचा सर्वे करून अहवाल मिळावे या निमित्तानेशिवसेना गुंठेवारी विकास समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील बारा वर्षाच्या कालावधी संपलेल्या आरक्षणातील जागेवरील आरक्षणाने बाधित झालेल्या रहिवाशांची व पूर पट्ट्यातील रहिवाशांच्या ज्यांना पाणी-घरपट्टी विभागात नोंद असलेल्या घरांचा सर्वे करून अहवाल मिळावे तसेच महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण व पूर पट्ट्यातील रहिवाशांचा अधिकृत अहवाल महापालिकेकडून मिळाला आहे. याबाबत पाठपुरावा राज्य सरकारकडे करून कायद्याच्या चाकोरित येथे विषय घेण्यास राज्याचे मुख्यमंत्री यांना राज्यातील शहरी भागातील सर्व महानगरपालिका व पालिका यांच्याकडून असे अहवाल मागवून त्याचे एकत्रीकरण करून त्यांची घरे, मालकी हक्काची व्हावी त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.तरी महापालिकेने या गोरगरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी या विषयात आग्रही भूमिका घेऊन संबंधित अधिकारी वर्गाचे योग्य त्या सूचना आपणाकडून व्हाव्यात अशा मागणीचे निवेदन शिवसेना गुंठेवारी विकास समिती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख चंदन दादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना देण्यात आले. तसेच यावेळी मुस्लिम समाजाचे नेते अशी बाबा बोलताना म्हणाले पूर पट्ट्यातील 80% घरेही मुस्लिम बांधवांच्या आहेत तरी मुस्लिम समाजाला न्याय मिळावा यानिमित्ताने शिवसेना गुंठेवारी विकास समिती पाठिंबा दिला,यावेळी विजय बल्लारी, बाबासाहेब सपकाळ, सुरेश साखळकर, प्रदीप निकम उपस्थित होते.
