प्रतिनिधी, औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ येत्या 19 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. या समारंभाला सुपर कॉम्प्युटर चे जनक डॉ. विजय भटकर यांचे दीक्षांत भाषण होणार आहे. तसेच या दीक्षांत समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना डि.लीट पदविने गौरवण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठातील 550 ते 600 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. समारंभाचे सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी राहणार उपस्थित कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी माहिती दिली
