जनतेज न्युज

विधानसभेच्या निवडणुकीपूरती सर्व पक्षांना बहुजनांची मते आठवतात.

प्रतिनिधी, सातारा : राज्यामध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आल्यावर सर्वच पक्षांना शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचाराचे मते आठवतात .मात्र त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाला विधानपरिषदेचे उमेदवारी मात्र गेले अनेक वर्ष डावली जाते.सध्या राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत असताना देखील भाजपकडून आरपीआय,रयत शेतकरी संघटना व इतर सहयोगी पक्षांच्या नेत्यांना एकही उमेदवारी न दिल्याने आरपीआय पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड हे भाजप पक्षावर नाराज झाले असून विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आमच्या मतांचा नुसता वापर केला जातो असा घणाघाती आरोप भाजपचे नाव न घेता भाजपवर केला आहे.