जनतेज न्युज

विनयभंगाच्या गुन्हयात मा.न्यायलयाने दोन आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे

प्रतिनिधी, पंढरपूर : दिनांक 30/01/2022 रोजी रात्री 9.30 वा.चे सुमारास पंढरपूर शहरातील समतानगर भागात एक उच्च शिक्षित मुलगी जेवण आटोपल्यावर रोडने शतपावली करत असताना आरोपी नामे (1) विशाल नवनाथ माळी रा. शिवाजीनगर गोपाळपूर ता.पंढरपूर (2) राहुल अशोक डांगे रा. गोपाळपूर ता. पंढरपूर व एक विधीसंशर्घीत बालक असे तिघेजणांनी मोटार सायकलवरुन तिचे मागे मागे जात तिचे जवळ जावून तिचा विनयभंग केला होता हा प्रकार घडत असताना ती ओरडल्याने  आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील लोकांनी त्यांना आडवून धरुन ठेवून पोलीसांना कळविल्याने पोलीसांनी त्या ठिकाणी तात्काळ जाउन आरोपींना ताबेत घेतले होते याच आरोपीतांनी तसेच विधी संघर्ष बालकाने दिनांक 28/01/2022 रोजी रात्री 10.00 वा.चे सुमारास देखील मोटार सायकलवरुन त्याच भागात जावून शतपावली करणा-या दोन महाविद्यालयीन मुलींचा ही विनयभंग केला होता या घडलेल्या घटनेमुळे समतानगर भागातील लोक सर्तक होते. या दोन्ही घडलेल्या घटने बाबत दिनांक 31/01/2022 रोजी समतानगर येथे राहणा-या एका मुलीने पंढरपूर शहर पोलीस ठाणेत वरील आरोपी व विधी संघर्ष बालकाचे विेरोधात तक्रार दिल्याने पंढरपूर षहर पोलीस ठाण्यात गुरनं 54/2022 भा.द.वि.सं.कलम 354,354(अ),354(ड),34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता व गुन्हयाचा तपास निर्भया प्रथक प्रभारी, पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत भागवत यांचेकडे देणेत आला होता. पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत भागवत यांनी या गुन्हयाचा 24 तासाचे आत तपास पुर्ण करुन दिनंाक 01/02/2022 रोजी पंढरपूर येथील न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांचे न्यायालयात दोशारोपत्र दाखल केले होते  व गुन्हयाचा खटला जलदगतीने  न्यायालयात चालवणेसाठी पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. अरुण पवार यांनी न्यायालयास पत्र देवून विनंती केली होती त्याप्रमाणे न्यायालयाने जलदगतीने खटला चालवून आरोपी विशाल नवनाथ माळी व राहुल अशोक डांगे यांना भारतीय दंड विधान संहिता विधान कलम 354, 34 मध्ये एक वर्श सक्त मजुरी व 2000 दंड, दंडन भरल्यास एक महिना साधी कैद,  कलम 354 (अ) मध्ये सहा महीने सक्त मजुरी शिक्षा व 500 दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम 354 (ड) मध्ये एक वर्ष सक्तमजुरी व 1000 दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.आर.कामत यांनी सुनावून सर्व शिक्षा एकत्रात भोगण्याचा निकाल दिला आहे.सरकारी पक्षाच्या वतीने सहा.सरकारी अभियोक्ता केतन शिवाजीराव देशमुख यांनी काम पाहिले असून त्यांनी न्यायालया समोर उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ देवून सरकारी पक्षाची ठाम बाजू मांडून महत्वाची भुमीका पार पाडली आहे.