प्रतिनिधी , मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य सुविधा, किन्नरांना ओळखपत्र, किन्नर आश्रम इत्यादी मागण्यांसाठी तसेच किन्नरांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी तसेच न्याय मिळण्यासाठी शासनाकडून कायदा तसेच उपाय योजना करण्यात याव्या यासाठी किन्नर संघटनेच्या सदस्यांकडून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेण्यात आली. यावेळी किन्नरांना भेडसावणाऱ्या समस्या राज्यपालांसमोर मांडण्यात आल्या. तसेच किन्नरांना मानधन सुरू करण्यात यावे अशीही मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात आली.
