प्रतिनिधी, धुळे : धुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाहेर बाजारामध्ये मिळणाऱ्या वस्तू कमी दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या प्रयत्नातून न्यू सबसिडी कॅन्टींग चे नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आले. या कॅन्टीनचे उद्घाटन आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुढे धुळे जिल्हा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी विविध नामांकित कंपन्यांचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून त्यांच्यावर बाजार भावापेक्षा अधिकचा 30 ते 35 टक्के डिस्काउंट पोलीस कर्मचाऱ्यांना मिळेल, असा प्रयत्न धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यातर्फे सुरू आहे.
अजून लवकरात लवकर संबंधित अधिक कंपन्यांशी चर्चा करून ही स्कीम देखील पोलीस कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून पोलीस कर्मचाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर सांगितले आहे.
