जनतेज न्युज

वीजबिल माफीच्या मागणीसाठी मनसेचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा.

प्रतिनिधी , अकोला : अकोला जिल्ह्यातील शेतकरी,घरघुती वीज ग्राहक यांचे वीजबिल माफ करावे या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेनं मोर्चा काढला.या मोर्चात शेकडो मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोर्चा दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला अनेकवेळा निवेदन देऊनही महावितरण कंपनी कोरोना काळातील वीजबिल माफीला तयार नाही.जोपर्यंत हे वीजबिल माफ केलं जाणार नाही तोपर्यंत आणखी आक्रमकतेनं आंदोलनं सुरूच ठेऊ असा ईशारा मनसेकडून देण्यात आलाय.