जनतेज न्युज

वीज ग्राहकांनी थकबाकी भरावी यासाठी महावितरणाची वेगळी शक्कल

प्रतिनिधी , पुणे – महावितरणची राज्यातील ग्राहकांवर जवळपास 70 हजार कोटी रुपयांची विद्युत देयक थकबाकी आहे. ग्राहकांनी थकबाकी देयक न भरल्याने महावितरण समोर मोठं आर्थिक संकट उभं राहिल आहे. यासाठी महावितरण खात्याने नवी संगीतामय युक्ती शोधून काढली आहे. महावितरणचे आर्थिक संकट ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी पिंपरी – चिंचवडच्या महावितरण विभागाने आरकेस्टा संगीताची मदत घेतली आहे.

 महावितरणचे अधिकारी तसेच कर्मचारी या आरकेस्टा संगीतात गाणी गाऊन महावितरणच्या ग्राहकांना विद्युत देयक थकबाकी भरण्यासाठी आवाहन करत आहेत.  पिंपरी चिंचवड शहरातील  प्रत्येक  सोसायट्यामध्ये जाऊन आरकेस्टा संगीताच्या माध्यमातून महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना विद्युत देयक थकबाकी भरण्याच आवाहन करताना दिसून येत आहेत.   

ग्राहकांनी वेळेत विद्युत देयक थकबाकी भरणा केला नाही, तर महावितरण अजून मोठ्या आर्थिक संकटात जाईल. कदाचित सरकार महावितरणाच खासगीकरण देखिल करेल. या भितीपोटी महावितरण कर्मचारी ग्राहकांना विद्युत देयक थकबाकी भरण्यासाठी आवाहन करत आहेत. कारण आता जर थकबाकी दिली नाही तर महावीतरणाचे इतर सरकारी संस्था सारख खाजगीकरण देखील होवू शकते. अशी भीती महावितरण कर्मचाऱ्यांना सतावत आहे.