जनतेज न्युज

व्याजाच्या पैशासाठी 108 च्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टरचे खाजगी सावकाराकडून अपहरण

प्रतिनिधि , परतूर : पैशासाठी 108 च्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टरचे खाजगी सावकाराकडून अपहरण
-रूग्ण घेऊन जात असतांना रोहिणा गावाजवळ चाकूचा धाक दाखवून अपहरण,परतूर पोलिसांच्या मदतीने डॉक्टरची सुटका, खाजगी सवकारा विरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
परतुरच्या ग्रामीण रुग्णालयत108 रुग्णवाहिकेतील डॉक्टर हिरालाल जाधव हे बाळाला उपचारासाठी घेऊन जात असताना रोहिणा गावाजवळ दुचाकी वरून आलेल्या जयपालसिंग जुन्नी आणि त्यांच्या भाऊ यांनी रुग्णवाहिका आडवून डॉक्टर हिरालाल जाधव यांच्या गळ्याला चाकू लावून त्याचं अपहरण केल्याची घटना समोर आलीय, या बाबद बि.व्ही.जी कंपनीला कळवळा असता कंपनीच्या डॉक्टरांनी पुणे येथील डॉक्टरांना या बाबद कळवले असता डॉक्टर जाधव यांचे अपहरण झाल्याचा प्रकार सामोर आला, पुणे येथील डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत,आरोपी जयपालसिंग जुन्नी आणि त्यांच्या भावाच्या तावडीतून डॉक्टरांची सुटका करत, आरोपी जयपालसिंग जुन्नी आणि त्यांच्या भाऊ यांना ताब्यात घेत , त्यांच्या विरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.