प्रतिनिधी , धुळे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोणाच्य पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की, मोठ्या प्रमाणात रक्तदान करा तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने रक्तदान करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली, तसेच 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे शहरातून व्हारचुवल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
