सुदैवाने जीवितहानी टळली…
सुदैवाने जीवितहानी टळली…
जळगाव प्रतिनिधी-:शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंट अॅन्ड बार येथे आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शाॅर्टसक्रीटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत हाॅटेलच्या प्रवेशद्वारा जवळच असलेले किचन जळुन खाक झाले आहे. नगरपालिकेचे सफाई मुकादम बापु ब्राम्हणे व त्यांचे सहकार्यांना सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ न. पा. अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे राजु कंडारे, आबा पाटील, भिकन गायकवाड, युसुफ खान यांना आग विझविण्यात यश आले. सदरची घटना पहाटे घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. सुदैवाने किचन मध्ये असलेले गॅस सिलेंडर ने पेट घेतला असता मोठी दुर्घटना होवु शकली असती.
