जनतेज न्युज

शहरात पार्किंगची पी 1,पी 2 पद्धत सुरु, गाडी पार्किंग करणाऱ्यांनी नियम पाळण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन

प्रतिनिधी, जालना : शहरातील अरुंद रस्ते,ट्राफिकची समस्या सोडवण्यासाठी शहर वाहतुक शाखेने शहरात पी 1,पी 2 पध्दत सुरू केली असून या नियमाच गाडी पार्किंग करणाऱ्यांनी पालन करावं असं आवाहन शहर वाहतुक शाखेच्या वतीने करण्यात आलं आहे.शहरातील वाहतूक समस्या त्याच बरोबर पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी वारंवार सामाजिक संघटना आणि नागरीकांकडून पोलीस अधीक्षक तसेच शहर वाहतूक शाखेला निवेदने देण्यात आली होती.अखेर पोलिसांनी विस्कळीत झालेल्या वाहतुकीला पर्यायी मार्ग शोधत पी 1 तसेच पी 2 पद्धत सुरु केली आहे.नागरीकांनी या नियमांचे पालन करावे तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.नागरीकांकडून केवळ दंड वसूल करणे हा हेतू नसून एक चांगली सवय लावणे हेतू असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.