प्रतिनिधी ,धुळे: विज बिल माफीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात मनसैनिकांची आपसात शाब्दिक बाचाबाची …
वीजबिल संदर्भात मोर्चाच्या श्रेयवादावरून मनसेच्या दोन गटात राडा..
वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्तीमुळे मिटला वाद….
वाद मिटल्यानंतर पुन्हा काढण्यात आला मोर्चा….
आज धुळे मनसेच्या वतीने वाढीव वीज बिलासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र हा मोर्चा नियोजित स्थळी म्हणजेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचण्या आधीच मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोर्चाच्या श्रेयवादावरून आपसात भर रस्त्यावरच जुंपली. यावेळी मोर्चात उपस्थित असलेल्या पोलीस व पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
