प्रतिनिधी, अहमदनगर : शाळेतील दहा ते बारा वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आले असून यासाठी लहान वयोगटातल्या मुलांमध्ये एक नवचैतन्य व आश्चर्य संचारले आहे. यातच दोन वर्ष कोरोना मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक बौद्धिक क्षमतेवर परिणाम झाला होता परंतु आता आनंददायी शिक्षण घेताना अध्ययन अध्यापन व विद्यार्थ्यांची अभ्यासा प्रति वाढलेली रुची यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
