प्रतिनिधी , बुलडाणा : आज पहाटेच्या सुमारास शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहात दोन बालकांनी आत्महत्या केली होती.त्यासंदर्भात बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आरोप केलाय.हे बालसुधारगृहात खाजगी मालकीच्या जागेत असून बालकांची आत्महत्या ही तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काजीपणामुळे झालेली आहे. त्या ठिकाणी शासन नियमाप्रमाणे सोई सुविधा आहेत का ? सदर ठिकाणी कार्यरत असणारे अधिकारी,कर्मचारी व अति महत्वाची अधिकारी यांचे लक्ष आहे का ? या सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच्याकडे संजय गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे..
