प्रतिनिधी , अमरावती : सध्याच्या स्थितीला राज्यात कांदयाचे भाव वाढल्याने अमरावती जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. वाढत्या कांदयाच्या भावामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एकच ओरड पाहायला मिळत आहे. मात्र, याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत नसून तो पूर्ण फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. काही दिवसातच शेतकऱ्यांचा कांदा जेव्हा बाजारपेठेमध्ये येईल तेव्हा कांद्याचे भाव पूर्णपणे घसरलेले असेल, त्यामुळे कांदा उत्पादनासाठी लागलेला खर्च ,शेती निविष्ट वर वाढलेला जीएसटी व शासनाचे कांदा निर्यात धोरण या सर्वांमुळे या वर्षी शेतकऱ्यांना कांदा रडवणार असल्याची चिंता अमरावती जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील सुनील शेरावाल या शेतकऱ्याने आपल्या शेतात तीन एक़्क़र एवढ्या क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली आहे, मात्र मात्र आत्ता बाजारपेठेमध्ये कांद्याला 30 ते 35 रुपये किलो एवढा भाव आहे पंण जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा निघेल तेव्हा तो भाव आठ ते १० रुपया वर येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरचे लागलेले पैसेही निघणार नाही व त्याच्या कुटुंबावर रडण्याची वेळ हा कांदा यावर्षी आणणार आहे अशि प्रतिक्रिया यां शेतकऱ्यांने व्यक्त केली. कारण या कांदा पिकाच्या लागवड़ीला व मशागतिला मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते, मात्र मजुरांच्या मजूरिच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, या कांदा पिकासाठी व शेती साठी जे साहित्य घ्यावे लागते त्याचे भाव व त्यावर लागलेला १८ ते २५ टक्के जीएसटी त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागत आहे. साधारण एक एकर कांद्याला ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो व त्यातून सरासरी ७५ ते ८० क्विंटल कांद्याचे उत्पादन होते, मात्र तो कांदा दर दहा रुपये किलो ने बाजारपेठेमध्ये विकला गेला तर ८० क्विंटल कांद्याला ८० हजार रुपये मिळेल, मग तीन महिने मेहनत करून 80 हजार रुपये मधून साठ हजार रुपये खर्च वजा केला तर वीस हजार रुपये मला ३ ते ४ महिन्यात नफा मिळेल,म्हणजे ५ हजार रुपये महिन्या,एका हॉटेल मधल्या वेटर ला सुद्धा जास्त असु शकतो, त्यामुळे कांदयाला २० ते २५ रुपये किलो एवढा दर मिळाला तर शेतकऱ्यांना काही पैसे मिळू शकतील त्यासोबतच सरकारने जे कांदा साठीचे निर्यात धोरण आखले आहे त्यामध्ये ही सुधारणा केली पाहिजे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी खंत कांदा उत्पादक शेतकरी सुनील शेरावाल यांनी व्यक्त केली.
ज्या वेळी शेतकऱ्यांचा कांदा बाजारपेठेमध्ये येतो तेव्हा व्यापारी मोठ्या प्रमाणात कमी दरात कांदयाची खरेदी करतात व त्या कांदयाची साठवणूक करतात ,व ज्या वेळी शेतकऱ्यांचा कांदा संपतो त्यावेळी व्यापारी बाजारपेठेमध्ये साठवलेला कांदा विक्रीसाठी काढतात त्यामुळे शेतकऱ्यांकडून पाच ते दहा रुपये किलोने घेतलेला हा ग्राहकांना २० ते २५ रुपये किलो एवढ्यात चढ्या दरात विकल्या जातो,त्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने कांदा साठवणुकीसाठी जर मदत केली तर मिळणारा नफा हा शेतकऱ्यांना मिळेल अशी प्रतिक्रिया नांदगाव पेठ येथील शेतकरी हरिदास रंधवे यांनी व्यक्त केली.
अमरावती जिल्ह्यात यावर्षी ३०५० हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली असून यामधून सरासरी पंधरा मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाने दर्शविला आहे , शेतकऱ्यांनी कांदयाची साठवणूक करावी जेणेकरून कांदयाला जेव्हा बाजारपेठेमध्ये योग्य भाव येईल तेव्हा शेतकऱ्यांना कांदा विकता यावा यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत ५० टक्के अनुदानावर कांदा चाळ उपलब्ध व्होवू शकते. व त्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने कांद्याची साठवणूक केली तर वर्षभर कांदा हा चांगला राहू शकतो व शेतकऱ्यांना यापासून फायदा होऊ शकतो अशी प्रतिक्रिया जिल्हा कृषी अधीक्षक अमरावती विजय चवाळे यांनी व्यक्त केली.
