जनतेज न्युज

शासन नियमाप्रमाणे कोरोणा निममात शिथीलता मात्र वाढती रुग्णसंख्या पाहाता नियमाचे पालन करने अवश्यक – कौस्तुभ दिवेगांवकर

प्रतिनिधी , उस्मानाबाद : शासन नियमाप्रमाणे रूग्णसंख्या वाढीच्या दराप्रमाणे नियमात दोन दिवसापुर्वी शिथीलता दिली आहे मात्र गेल्या १५ दिवसात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण वाढत आहेत .आज ५ पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेली ३१ गावे आहेत ज्यात तपासणी संख्या वाढवली आहे . सध्या जिल्ह्याचा दर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या लेवलमधे असला तरी बीड प्रमाणे निर्बंध येऊ नयेत यासाठी कोरोणाला सहज न घेता दिलेल्या शिथीलतेतही नियमाचे पालन करणे आवश्यक असुन नागरीकांनी त्याचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी केले आहे .